Red Spinning Frozen Snowflake

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रीयविज्ञानदिनसाजरा

 आज  दिनांक 28 फेब्रुवारी2024 रोजी जि.प.प्रा. शा.किणी शाळेत राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी श्री राठोडसर , श्री.लोमटेसर ,श्री आचार्यसर ,श्रीमती मंजुषा स्वामी,श्रीमती शोभा झाडे,श्रीमती बेबी नाईकनवरे ,अंजलीताई  उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त प्रयोगाचे प्रदर्शन भरवण्यात आले.  शाळेतील पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांंनी सहभाग नोंदविला.राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त आयोजित  विज्ञानसप्ताह    डायट धाराशिव  आयोजित विविध उपक्रम घेण्यात आले.यात विज्ञानकोडे ,प्रश्नमंजुषा ,विज्ञान चिञकला ,शास्त्रज्ञांची माहिती मुलाखत  प्रयोग अशा विज्ञानसप्ताह साजरा करण्यात आला.घेतलेल्या उपक्रमांचे व आजच्या प्रयोगातुन पाच प्रयोग परिक्षण करुन काढण्यात आले. आज पहिली ते सातवीपर्यंतचे  विद्यार्थांनी  विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला. मान्यवर व्यक्तींनी  विविध स्पर्धेतील विद्यार्थीवर्गास बक्षिस वाटप करण्यात आले.   श्रीमती मंजुषा स्वामी  यांनी विद्यार्थांना विज्ञान दिनाची माहिती सांगितली.सदर कार्यक्रमाचे आभार  प्रदर्शन श्रीमती  शोभा झाडे   यांनी केले.या प्रसंगी   जोतिराम पवार व सौ.पवार या उपस्थित होत्या.याचबरोबर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.🔭📡🔬🦠🧪🔍

आजचे  क्षणचिञे 
































मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रीयविज्ञानदिन

 💫💫💫💫💫💫💫💫*   *राष्ट्रीय  विज्ञानदिनानिमित्त विशेष* जाणून घेऊ या              

              *सीव्ही रमण*  यांचे संपूर्ण नाव सर चंद्रशेखर वेंकट रमण असे आहे. सीव्ही रमण भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते. ज्याने १९३० मध्ये भौतिकशास्त्रासाठी, प्रतिष्ठित असलेला नोबेल पारितोषिक प्राप्त केला. यानंतर १९५४ मध्ये त्यांना भारत सरकारने, भारतातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवीत केले.    गंमत म्हणजे एका प्राध्यापकास चुकून, हा छोटा मुलगा कॉलेजमध्ये आला असावा असे वाटले. तेव्हा रामन यांनी निर्भयपणे सांगितले की, मी चुकून येथे आलो नसून, या वर्गात माझे नाव दाखल केले आहे, म्हणून आलो आहे. या छोट्या मुलाबद्दल कौतुक वाटत असतानाच, बीए च्या पदवी परीक्षेत पहिल्या वर्गात पाहिले आले.

           पदार्थ विज्ञान शास्त्र मध्ये त्यांना सर्वाधिक गुण मिळाले व त्यांनी सुवर्णपदक पटकावले. एमएच्या परीक्षेतही त्यांनी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला. आपल्या मनाविरुद्ध घरच्या मंडळींच्या दबावामुळे ते हिंदुस्थान सरकारच्या खात्याच्या परीक्षेत बसले. आश्चर्य म्हणजे या परीक्षेत ते सर्व भारतात पहिले आले.                                    

              एकदा डॉक्टर रामन जहाजाने इंग्लंडला जात होते. तेव्हा त्यांनी पाहिले की, समुद्राचे पाणी निळे दिसते. परंतु, त्यांनी एका ग्लासात ते पाणी घेतले असता, ते रंगहीन असल्याचे त्यांना आढळून आले. त्यातच त्यांनी संशोधन केले.प्रकाश जेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून जात असतो, तेव्हा त्याच्या तरंग लांबीत वाढ होते किंवा तरंग लांबी कमी होते. याचा सिद्धांताला प्रकाशाचे विकीकरण असे म्हणतात.


यालाच प्रकाशाचे अनियमित परावर्तन असेही म्हणतात. या सिद्धांताने त्यांना जागतिक दर्जाचे संशोधन म्हणून मान्यता मिळवून दिली आणि त्यांची नोबेल पारितोषकासाठी निवड झाली.                  १९८७  सालापासून भारतामध्ये २८ फेब्रुवारी हा दिवस रामनांचे संशोधन आणि त्यांचे विज्ञान प्रसाराचे कार्य याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सीव्ही रामन यांना १९३१ साली नोबेल पारितोषिक मिळाले. त्या सणाची आठवण म्हणून, भारत सरकारने २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले. भारत सरकारने ही त्यांना भारतरत्न देऊन, उचित गौरव केला. २८ फेब्रुवारी हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.                          जगातील प्रत्येक वस्तू स्वतःचं असं वैशिष्ट्य बाळगून असते. त्यामुळेच आपल्याला ढोबळ मानाने दोन वस्तूंमधला फरक जाणवतो. तसाच फरक पदार्थाच्या विविध रेणूमध्ये असतो. म्हणजेच ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे हे भिन्न असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक मॉलिक्युलमधून होणारे प्रकाशाच्या विक्र्णाचा परिणामही वेगळा असतो. म्हणजे त्या प्रकाश किरणाचा आणि एनर्जी ही प्रत्येक मॉलिक्युलस साठी निश्चितपणे, पूर्णतः वेगळी असते. त्यामुळेच आपण विशिष्ट मिश्रणातील घटक पदार्थ अगदी नेमके ओळखू शकतो. म्हणजे समजा जर तुम्हाला एखाद्या द्रावण किंवा मिस्टरी लिक्विड भरलेला ग्लास दिला आणि त्यात कोणते घटक वापरले आहे ते फक्त पाहून सांगा असे सांगितले तर, तुम्हाला ते ओळखता येतील का ? शक्य नाही. पूर्णपणे विद्राव्य असलेल्या द्रावणातून, त्यातील घटक नुसते पाहून सांगणे शक्यच होणार नाही. परंतु रामना इफेक्ट्सच्या साह्याने पदार्थाची चव, गंध न घेता त्यातील घटक अचूक ओळखता येतात.आणि त्यासाठी उपयुक्त ठरते रामण स्पेक्ट्रोग्राफी.          आता हि रमण स्पेक्ट्रोस्कोपी नेमकं काम कसे करते ते पाहू यासाठी एक उदाहरण घेऊ समजा – आपल्या घराबाहेर एखादा सुरुंग किंवा मोठा फटका फुटला, तर या स्फोटामुळे घरातील खिडक्यांच्या काचा कंप पावतात. म्हणजेच काय तर, ध्वनीमुळे खिडक्यांच्या काचा कंप पावतात. त्यामध्येही कंपने निर्माण होतात आणि नाद घुमतो. अगदी तसेच पदार्थ हे रेणुनी बनलेले असतात. रेणू हे आकाराने अतिसूक्ष्म असतात. त्यामुळे साध्या प्रकाश किरणामुळे, देखील या रेणूंमध्ये कंपने निर्माण होतात. परंतु, रेणू अतिशय लहान असल्याने, ही कंपने, अतिशय लहान असतात. अनेक कंपनानी मिळून बनला आहे. यात जांभळ्या रंगाची कंपने वेगळी, तर लाल प्रकाशाची कंपने वेगळी, प्रत्येक पदार्थांमध्ये असलेल्या अणु रेणूंच्या रचनेत, या प्रकाशातील कुठल्या ना कुठल्या कंपन्यांशी जुळवून, घेण्याची क्षमता असते. मग ती कंपने, तात्पुरत्या स्वरूपात वस्तूमध्ये अडकतात आणि क्षणभराने ती बाहेर पडतात.       ही कंपने मोजता आली की, वस्तूची रचना आपल्याला कळते आणि त्यामुळे पदार्थाची चिरफाड न करता देखील त्यातील घटक द्रव्य आपल्याला समजून घेता येते. वस्तूमधील निर्माण झालेल्या विक्रीणाच्या प्रकाशाची नोंद घेणे, यालाच रामनवर्णपट किंवा रामण स्पेक्टोग्राफ असे म्हणतात.       आता संगणकाच्या सहाय्याने हा रामनवर्णपट अधिक मोठा करून, त्यातील बारकावे अभ्यासणे आपल्याला शक्य झाले आहे. लेझर किरण इलेक्ट्रॉनिक संवेदक आणि वेगाने गणिती तपासणी करणारे संगणक यामुळेच रमण वर्णपटाचे विश्लेषण अधिक सोपे जलद आणि अचूक करणे शक्य झाले आहे. यामुळे दैनंदिन आणि व्यवहारी जीवनात याच्या अनेक ठिकाणी वापर केला जात आहे. उदाहरणार्थ कृषी क्षेत्रामध्ये, कीटकनाशके बनविण्यासाठी, औषधे याचा वापर केला जातो. शेतातील पिकावर वाढणाऱ्या किट किटकांमध्ये कोणते रसायन आहे ते नेमके ओळखून त्याला मारक रसायनांचा वापर करून, कीटकनाशके तयार केली जातात. तसेच रामण परिणामांचा वापर आज वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी सहज केला जात आहे. यातील अजून एक उदाहरण म्हणजे फार्मासिटिकल इंडस्ट्रीज म्हणजे औषध उद्योग, औषध गोळ्यांमधील रासायनिक घटकांचे वितरण करण्यासाठी, औषधांमधील रासायनिक घटकांचे विश्लेषण आणि प्रमाण तपासण्याकरिता, तसेच कच्च्या सामग्रीची गुणवत्ता व शुद्धता तपासण्या करीत आहे रामण परिणामांचा वापर केला जातो.

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

मराठी भाषा गौरवदिन


कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारनं घेतला. 

कवी कुसुमाग्रज

            मराठी साहित्यातील महान कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये नाशिकमध्ये झाला होता. कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. विष्णू वामन शिरवाडकर यांना ‘कुसुमाग्रज’ या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितांचे स्वातंत्र्य यावर विपुल लेखन केले आहे. भारतीय साहित्यातील उत्कृष्ट नमुना म्हणून कुसुमाग्रज यांचे साहित्य मानले जाते.

                  मराठी भाषेतील साहित्यासोबतच त्यांनी मराठी रंगभूमीसाठी देखील महत्वपूर्ण योगदान दिले आहे. १९९१ मध्ये त्यांना पद्मभूषणसह इतर अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज ही त्यांच्या साहित्यकृती या वाचकांना विपुल ज्ञान आणि प्रेरणा देतात. १० मार्च १९९९ मध्ये कुसुमाग्रज यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी नाशिकमध्ये निधन झाले.कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेसाठी मोठे योगदान दिले, त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी २०१३ पासून २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.


शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

**********************************************************